हा भारतीय लोकशाहीचा विजय -उज्ज्वल निकम

February 9, 2013 10:21 AM0 commentsViews: 7

09 फेब्रुवारी

अफजल गुरूला फाशी देण्याबाबत राष्ट्रपतींचे अभिनंदन. अफजल गुरूच्या फाशीच्या बाबतीत अनेक तर्कवितर्काना उतू आले होते. इथं काही राजकीय खेळी आहे का अशी हवा निर्माण झाली होती. पण आज या सर्व घटनांना पूर्णविराम मिळालेला आहे. दहशतवादाच्या बाबतीत कोणत्याही राजकारणाला भीक न घालता भारतीय लोकशाही प्रधान देशात कठोर पावलं उचलली जातात आणि राज्यघटनेला मानतो हे निश्चित सिद्ध करून दाखवले असा संदेश दिला जाईल. फाशीची प्रक्रिया ही गुप्तपणेच दिली जाते यासाठी जाहीर निमंत्रण अथवा समारंभ आयोजित केला जात नाही असा विचार करणेच गैर आहे अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

close