दुष्काळग्रस्त सांगलीत महापौरांच्या मुलाचे शाही लग्न

February 18, 2013 10:40 AM0 commentsViews: 43

18 फेब्रुवारी

एकीकडे दुष्काळाने महाराष्ट्र होरपळ असताना दुसरीकडे राजकीय नेते मात्र शाही लग्न सभारंभात दंग आहेत. सांगली जिल्ह्यातही दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना महापौर इदि्रस नायकवाडी यांनी आपल्या मुलाचं लग्नं शाही पद्धतीनं साजरं केलंय. हजारो निमंत्रितांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आणि बिस्लेरी बॉटलमधील पाण्याची उधळन करण्यात आलीय. या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्यात आलेत.या लग्न सभारंभात गृहमंत्री आर आर पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनीही उपस्थिती लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांनी पैशांची उदळपट्टी करू नये, असं बजावलं होतं. तरीही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या सल्ल्याकडे कानाडोळा केल्याचं दिसतंय.

close