शाबास पहेलवान, दुष्काळग्रस्तांना दिला लग्न खर्च !

February 18, 2013 11:18 AM0 commentsViews: 72

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

18 फेब्रुवारी

राज्यात दुष्काळ सुरू असताना अनेक नेते वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी उधळपट्टी करत आहेत. तर काही ठिकाणी दुष्काळाचाही गैरफायदा घेतला जातोय. पण, यातही आंतरराराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या हिंद केसरी अमोल बुचडे यानं एक आदर्श घालून दिला आहे. त्यानं कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणानं लग्न केलं आणि सर्व पैसा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे.अमोल बुचडे….. हिन्द केसरी, महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेता….कुस्तीच्या क्षेत्रात ख्याती मिळवणारा मल्ल….लग्नाच्या बेडीत अडकलाय, ना बॅन्ड बाजा, ना सनई चौघडे , आणी ना घोडा-गाडी, अत्यंत साध्या पद्धतीने अमोलचा हा विवाह सोहळा पार पडला. कुस्ती क्षेत्रात मिळवलेल्या यशा इतकाच हा सोहळा लक्ष वेधुन घेणारा ठरला.

अमोलनी त्याच्या लग्नावर होणारा सर्व खर्च दुष्काळ निधीसाठी दान केला आहे. अमोलच्या या निर्णयात त्याच्या पत्नीचाहा तितकाच वाटा आहे. अनेक दिगग्ज मल्लाना चितपट करत अमोल ने कुस्ती क्षेत्र गाजवलंय. आखाड्याच्या लाल मातीत भक्कमपणे उभा राहणारा अमोल तेवढ्याच ताकदिने दुष्काळ ग्रस्तांच्यामागेही उभा राहिल्याबद्दल त्याचं कौतुक करायला हवं..

close