शरद पवार लुटारू टोळीचे राजे -राजू शेट्टी

February 19, 2013 10:49 AM0 commentsViews: 34

19 फेब्रुवारी

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे लुटारू टोळीचे राजे आहेत अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगली जिल्ह्यातील शेटफळे येथे आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. भास्कर जाधव यांच्या मुला-मुलीच्या लग्नावर शरद पवार नाराज झाले पण पतंगराव कदमांच्या मुलाच्या शाही लग्नात का गेले असा प्रश्नंही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. पतंगरावांचे व्याही अविनाश भोसलेंनी कृष्णा खोरे लुटले म्हणून दुष्काळगृस्तांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

close