राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह

February 19, 2013 10:54 AM0 commentsViews: 50

19 फेब्रुवारी

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती…शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी होतेय. राज्यभरातील शिवप्रेमींनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. गडदेवता शिवाई देवीचा महाभिषेक पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्षांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तीन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी हुल्लडबाजी झाली होती त्यामुळे आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

शिवनेरीवर मुस्लिम ब्रिगेडकडून शिवजयंती साजरी

तर शिवजयंतीनिमित्त राज्यभरातील शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर गर्दी केली. या गर्दीत लक्ष वेधणारा एक बॅनर आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा…निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्यासोबत शिवनेरीवरील सोहळ्यात राज्यातील मुस्लिम तरूण सहभागी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम समाजाबाबतचे विचार देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न कर्नल सुरेश पाटील गेल्या 2 वर्षांपासून करत आहेत. रायगडावर शिवजयंती साजरी

किल्ले रायगडावरही आज शिवजयंती साजरी करण्यात आली. रायगड येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. रायगड जिल्ह्यातील महाड महसूल विभागाने ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले होते.

close