न सांगितलेल्या गुजगोष्टी

February 19, 2013 11:39 AM0 commentsViews: 1019

व्हॅलेन्टाईन्स डे…म्हणजे प्रेम व्यक्त करणं…प्रेमाचं सेलिब्रेशन करणं…याच निमित्ताने पुण्यात एक आगळं वेगळं सेलिब्रेशन होतं आहे 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' नाटकाचा शंभरावा प्रयोग…हे नाटक म्हणजे एक वेगळा पट आपल्यापुढे उलगडून दाखवतो… या नाटकातील चार कलाकार वीसहून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारतात आणि अक्षरश: एक वेगळा पट उलगडला जातो…प्रत्येक स्त्री-पुरूषच्या संदर्भात हा विषय जिव्हाळ्याचा, महत्वाचा आहे…पण या विषयाची खिल्ली उडवून विकृतीकरणाकडे लोटला जातो किंवा यावर अबोल राहणेच पसंत केलं जातं…अशा या विषयाला वाचा फोडली आहे 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या नाटकाने…यावरच हा विशेष कार्यक्रम…न सांगितलेल्या गुजगोष्टी…

close