अमरावतीत शिक्षकांचे पगार थकले

December 21, 2008 6:00 AM0 commentsViews: 2

21 डिसेंबर, अमरावतीप्रवीण मनोहर अमरावतीत कत्रांटदाराची बिल थक वल्यामुळं कोर्टान अमरावती जिल्हा परिषदेची मालमत्ता जप्त केली. यात शिक्षकांच्या पगारांची माहिती असलेले संगणकही जप्त केल्याने, जिल्हयातील शिक्षकांचे पगारच झाले नाहीत. त्यामुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत.सुनील केणे बेनोड्याच्या शाळेत पहिल्या वर्गाला शिकवतात. या मुलांच्याच वयाच्या त्यांच्या मुलीला सिकलसेलचा आजार आहे. गेल्या महीन्याचा पगारच झाला नसल्यानं तिच्या उपचारांसाठी लागणार्‍या पैशांची त्याना चिंता आहे . इतर शिक्षकांचीही परिस्थिती काहीशी अशीच आहे. सहा हजार पंच्याऐंशी शिक्षकांचे अद्यापही पगारच झालेले नाही. शिक्षकांच्या या प्रश्नावर प्रशासनाचं उत्तरही नेहमीचच आहे. "आमचं सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटरवर होतं. पण कॉम्प्युटरच नसल्याने आम्ही पगार देऊ शकत नाही" असं जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ बी.जी. सोमवंशी यांनी सांगितलं. वेळकाढूपणामुळं जिल्हा परिषदेवर जप्तीची पाळी आली . सहा लाखांची रक्कम त्यामुळच दहा लाखांवर गेली आहे. त्यामुळेअधीकारी कितीही दावे करत असले, तरी शिक्षकंाचे पगार इतक्यात न होण्याचीच शक्यता जास्त आहे.

close