‘भाकरीच्या चंद्रा’च्या शोधात दुष्काळग्रस्त शहरांच्या दारावर

February 20, 2013 11:54 AM0 commentsViews: 56

20 फेब्रुवारी

जसजसा उन्हाळा जवळ येऊ लागलाय तसे दुष्काळाचे चटके जाणवू लागल्यानं शहराकडं स्थलांतर वाढू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच मराठवाड्यातील वैजापूर भागातील 7 ते 8 कुटुंबांनी सध्या पुण्यातील नळस्टॉप भागातील फूटपाथवरच संसार मांडला आहे. घरातील बायका स्वयंपाक करून पोरांना सांभाळतात तर पुरूष मंडळी दिवसभर मोलमजुरी करतात. गावकडं पाऊस पाणी नसल्याने त्यांना शहरातील फूटपाथवर अडचणीतलं का असेना आयुष्य बरं वाटतंय. या स्थलांतर केलेल्या बाया-बापड्यांशी केलेली ही बातचीत….

close