शिवजयंतीसाठी जमलेल्या निधीतून जनावरांना चारा वाटप

February 20, 2013 2:59 PM0 commentsViews: 37

20 फेब्रुवारी

रयतेचं कल्याण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश शिर्डीजवळच्या लोणी गावातल्या पद्मश्री विखेपाटील युवा मंचनं प्रत्यक्षात उतरवला आहे. एकीकडे राज्यात दुष्काळ असताना ढोलताशा किंवा बॅन्जोच्या थाटामाटात शिवजयंती साजरी करणं या तरुणांना पटलं नाही. म्हणून त्यांनी मोठ्या धडाक्यात शिवजयंती साजरी करण्याऐवजी शिवजयंतीसाठी जमा केलेला तब्बल 1 लाखाचा निधी जनावरांच्या चारापाण्यासाठी दिला. विखेपाटील युवा मंचाच्या या उपक्रमाबद्दल लोणीतल्या शेतकर्‍यांनीही समाधान व्यक्त केलंय.

close