दोन दिवसांअगोदर स्फोटांची माहिती होती पण..-शिंदे

February 21, 2013 5:10 PM0 commentsViews: 9

21 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन स्फोट झाले. या स्फोटात 11 जण ठार तर 50 हून अधिक जण जखमी झाले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. एका सायकलीवर हे स्फोटकं ठेवण्यात आली होती. तसंच आम्हाला 2 दिवसांपूर्वी स्फोटांची माहिती मिळाली होती, पण नेमके कोठे होणार याबद्दल माहिती नव्हती अशी कबुलीही शिंदे यांनी दिली. ही माहिती देशभरात सुरक्षा व्यवस्थेला देण्यात आली होती. एनआयएची टीम याची अधिक तपासणी करत आहे. अजून स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही संपूर्ण तपासनंतर माहिती दिली जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं.

close