राज ठाकरेंची नुसती पोपटपंची-अजित पवार

February 22, 2013 12:27 PM0 commentsViews: 107

22 फेब्रुवारी

काही काही जण पोपटपंची सारखे असतात. मागे कोल्हापुरात भाषण केलं. कधी केलं संध्याकाळी…कधी त्यांनी दुपारच्या भर उन्हात सभा घेतली आहे का ? आणि नुसती पोपटपंची सारखी बडबड करायची, नक्कला करायच्या पण एक विचारतो टिंगलटवाळी करून नक्कला करून कधी जनतेचे प्रश्न सुटतली का ? अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. तसंच यांना यांच्या घरातल्या माणसाचं स्मारक चालतं पण बहुजन समाजाला ज्यांनी मोठ केलं त्यांचं स्मारक यांना पटत नाही. यांचं तोंडात एक पोटात एक, नक्कला करणारा एक, फोटो काढणारा एक आणि कामं करणारे तिसरेच असा कारभार आहे अशी टीकाही पवार यांनी केली.कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पोटनिवडणुकीच्या पक्षाच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते.

close