एसटीला टोलमधून सूट देण्याची मागणी

December 21, 2008 3:45 AM0 commentsViews: 1

21 डिसेंबरकोट्यवधींचा टोल आणि अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एस.टी. महामंडळाला बसतोय. राज्यात 93 हजाराहून अधिक वाहनं अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळं एस. टी. ला दरवर्षी 500 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. त्यासाठी टोलमधून एस.टी. ला सूट द्यावी, तसंच अवैध वाहतुकीपोटी वसूल केल्या जाणार्‍या दंडाचा काही हिस्सा एस.टी.ला द्यावा, अशी शिफारस विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीनं केली आहे.

close