मोहाली कसोटीत भारताचं पारडं जड

December 21, 2008 12:06 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर मोहालीमोहाली टेस्टमध्ये दिवसाच्या शेवटी पीटरसन आणि फ्लिंटॉफच्या विकेटमुळे भारताचं पारडं पुन्हा जड झालं आहे. त्याआधी कॅप्टन केविन पीटरसनची शानदार सेंच्युरी आणि फ्लिंटॉफने त्याला दिलेली साथ यामुळे इंग्लंडच्या टीमने भारताला चोख प्रत्युत्तर दिलं. फ्लिंटॉफनेही आपली 25वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे इंग्लंडने 250चा टप्पा ओलांडला. मात्र पहिल्या सेशनमध्ये भारताने आपलं वर्चस्व गाजवलं होतं. भारताने सुरूवातीलाच इंग्लंडला 2 धक्के दिले होते. तिस-याच बॉलवर झहीरने ओपनर अ‍ॅण्ड्र्यू स्ट्रॉसला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यावेळी इंग्लंडला रन्सचा भोपळाही फोडता आला नव्हता. भारतीय बॉलर्सने या झटक्यातून इंग्लंडला सावरायला वेळही दिला नाही. दुस-याच ओव्हरमधल्या पहिल्या बॉलवरच ईशांत शर्माने बेलला बोल्ड केलं. लंचनंतर कूक आणि कॅप्टन पीटरसनने संयमी खेळ करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण ओपनर कूक 50 रन्स काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. झहीर खानने त्याला आऊट करत मॅचमधली दुसरी विकेट पटकावली.मोहाली टेस्टमध्यला तिसरा दिवसही खराब वातावरणामुळे उशिरा सुरू झाला. मैदानावर धुकं असल्याने अंपायर्सना खेळ उशिरा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान काल भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये 453 रन्स केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडची सुरुवात खराब झाली.परंतु त्यानंतर कॅप्टन पीटरसन आणि फ्लिंटॉफ यांनी इंग्लडचा डाव सावरला. दिवसाच्या अगदी शेवटी पीटरसन 144आणि फ्लिंटॉफ 62 रन्सकरून आऊट झाले. दिवस अखेर इंग्लंडने 6 विकेटवर 282 रन्स केले. अ‍ॅडरसन 1 रन्सवर खेळत आहे. भारतातर्फे झहीर आणि अमित मिश्राने 2-2 तर हरभजन आणि इशांतने 1-1 विकेट घेतली.

close