‘सरल’ झेप

February 25, 2013 2:42 PM0 commentsViews: 47

25 फेब्रुवारी

भारताच्या अंतराळ मोहिमेत आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं आज मिशन 'सरल' ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. श्रीहरिकोटाहून एकाच वेळी सात उपग्रहांचं यशस्वीपणे लॉन्च करण्यात आलं. आज संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांनी इस्रोचं पीएसएलव्ही सी- (PSLV C)20 हे रॉकेट 7 उपग्रह घेऊन अंतराळात झेपावलं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी श्रीहरिकोटातल्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रात उपस्थित होते. भारत आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे बनवलेला सरल या चारशे किलो वजनाचा उपग्रह अंतराळात पाठवण्यात आला. सरल सोबतच कॅनडाचे दोन, ऑस्ट्रियाचे दोन, इंग्लॅड आणि डेन्मार्कचे प्रत्येकी एक असे सहा उपग्रहसुद्धा अंतराळात झेपावले. आणि त्यांच्या नियोजित कक्षेत स्थिरावले. आतापर्यत 21 यशश्वी मोहिमा सर करणार्‍या पीएसएलव्ही रॉकेटची ही 23 वी मोहीम आहे. भारतासाठी प्रतिष्ठेची असलेली ही मोहीम इस्त्रोनं यशस्वी करून दाखवली. वाढत्या अंतराळ स्पर्धेत भारतानं अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय.

close