हे रेल्वे बजेट नसून रायबरेली बजेट -मुंडे

February 26, 2013 12:02 PM0 commentsViews: 12

26 फेब्रुवारी

हे रेल्वे बजेट नसून रायबरेली बजेट आहे. या बजेटमध्ये फक्त रायबरेलीकडे लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे हे रायबरेली बजेट आहे का असा प्रश्न पडला आहे. या बजेटमध्ये रायबरेली,अमेठी,पंजाब या राज्यांचाच उल्लेख करण्यात आला पण देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश,बिहार,छत्तीसगढ, गुजरात सारखे देश असून त्यांच्यासाठी काहीही प्रयोजन या बजेटमध्ये करण्यात आले नाही त्यामुळे हे बजेट अन्याय करणारे बजेट आहे अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.