दुष्काळाबाबत मुंडेंचा लोकसभेत ‘आवाज’

February 26, 2013 2:14 PM0 commentsViews: 16

26 फेब्रुवारी

महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर लोकसभेत झाली. भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाची भीषण स्थिती लोकसभेत मांडली. दुष्काळाबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. याच आठवड्यात केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाठवण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. दुष्काळासाठी 5 हजार कोटी रुपये केंद्रानं ताबडतोब द्यावेत अशी मागणी मुंडे यांनी केली. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि वीजमाफी द्या, दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा, या तीन मागण्या मुंडेंनी केल्या. तर ही नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी केली.

close