मनसेच्या कार्यकर्त्यांनी भंगारातून कार आणून पेटवली

February 28, 2013 4:23 PM0 commentsViews: 35

28 फेब्रुवारी

मराठी भाषा दिनीच काल राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा संघर्ष दिवसभर पेटला. अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगार गावात राज ठाकरे यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यानंतर हा राडा सुरू झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर राज्यभरात मोर्चा, दगडफेक आणि जाळपोळ केली. मात्र बुधवारी रात्री कुर्ल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी भंगारातून जुनी मारुती कार आणून ती पेटवली. याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

close