दुष्काळग्रस्तांना लवकरच मदत मिळेल -राहुल गांधी

March 1, 2013 2:49 PM0 commentsViews: 37

01 मार्च

महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्तांना लवकरच मदत मिळेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच दुष्काळग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते. या एक दिवसाच्या दौर्‍यात त्यांनी मुंबईतल्या आमदार खासदारांची बैठक घेतली. पण या बैठकीला खासदार गुरुदास कामत गैरहजर राहिले.

close