कर्तव्यदक्ष पोलिसांनी ओबेरॉय मोहीम फत्ते केली

December 21, 2008 1:06 PM0 commentsViews: 4

21 डिसेंबर, मुंबई अजित मांढरेमुंबईतल्या ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निर्दोष पर्यटकांचा बऴी गेला. पण कोणत्याही प्रकारचं सुरक्षाकवच नसताना मुंबई एटीएसमधल्या पोलिसांच्या एका टीमनं युद्धजन्य परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता 21 जणांचा जीव वाचवला. सीएसटी, नरिमन हाऊस, ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल. ही चार नावं एकत्र आली की आठवण होते ती 26 नोव्हेंबंरच्या दहशतवादी हल्ल्याची. त्या रात्री मंुबईत नक्की कुठे काय होतंय ह्याची कल्पना कोणालाच नव्हती. अशीच काहीशी परिस्थिती होती एटीएसचे पीएसआय योगेंद्र पाचे यांची आणि त्यांच्या टीमची. योगेंद्र पाचे आणि त्यांची टीम आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत ओबेरॉय हॉटेलमध्ये शिरली. 'सतत होणारा गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यामुळे आम्हीही दोन क्षण कचरलो होतो.ओबेरॉयमध्ये शिरताच 15 मृतदेह पडले होते. पण त्यातील एक बाई जिंवत होती. तिला शांत राहण्यास सांगितलं आणि तिला वाचवलं', असं एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र पाचे सांगत होते. योगेंद्र पाचे आणि त्यांच्या टीमनं दाखवलेलं हे धाडस वाखण्याजोगं आहे. एनएसजी कमांडो आणि पोलिसांच्या धडक कारवाईमुळेच 28 तासातचं ऑपरेशन ओबेरॉय फत्ते झालं. ज्यावेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मंुबई पोलीस काय करत होते, असा प्रश्न विचारला जातोय. पण पोलीस किती प्रयत्नशील होते, ते ह्या घटनेवरूनच स्पष्ट होतंय.

close