सुनंदन लेलेंचं ‘पाकिस्तान-समज गैरसमज’ पुस्तक प्रकाशित

March 4, 2013 4:45 PM0 commentsViews: 26

04 मार्च

आयबीएन लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्टस् एडिटर सुनंदन लेले यांच्या 'पाकिस्तान – समज गैरसमज ' या पाकिस्तानच्या क्रिकेट दौर्‍यातील अनुभवांवर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे, क्रिकेटर इरफान पठाण यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व हे राजकारण्यांमुळे आहे, कलाकार आणि खेळाडू यांच्यामुळे या दोन्ही देशातील माणसे जोडण्याचं काम होतेय. सुनंदन यांचे हे पुस्तक हेच काम करेल असा विश्वास निखिल वागळे यांनी व्यक्त केला.

close