मुंबईत नॅशनल पार्कमध्ये वणवा पेटला

March 5, 2013 1:23 PM0 commentsViews: 55

05 मार्च

मुंबईत नॅशनल पार्कमध्ये सोमवारी एका पाड्याजवळ लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीमुळे पेटलेला वणवा पार्कच्या परिसरात पसरला आहे. हा वणवा गोरेगाव फिल्मसिटीपर्यंतही पोहोचली आहे. आज सकाळी पुन्हा ही आग भडकली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.तर दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या निळीक आणि कोंडीवली गावातल्या जंगलामध्ये पेटलेला वणवा आता विझला आहे. 200 एकर परिसरात हा वणवा पेटला होता. आंबा-काजुच्या 30 बागा, तुर शेती आणि भाताच्या उडव्याही या वणव्यात जळाल्यात. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. गेल्या काही दिवसांमधली खेड परिसरातली ही तिसरी घटना आहे. या आधी सुकवली आणि सवेली इथंही वणवा पेटला होता.

close