आइन्स्टाइनपेक्षाही नेहा हुशार !

March 6, 2013 12:50 PM0 commentsViews: 53

06 मार्च

इंग्लंडमधल्या बारा वर्षांच्या नेहा रामू या भारतीय वंशाच्या मुलीचा आय क्यू म्हणजे बुद्‌ध्यांक सर्वाधिक असल्याचं आयक्यू चाचणीमध्ये स्पष्ट झालं आहे. श्रेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्याहीपेक्षा हा आयक्यू अधिक आहे. इंग्लंडमधल्या नेहा रामूने मेन्सा आय क्यू चाचणी परीक्षा दिली. या चाचणीमध्ये तिला तब्बल 162 गुण मिळाले. तिच्या वयोगटातील हे सर्वाेच्च गुण मिळाले आहेत. आइन्स्टाइन, स्टीफन हॉकिंग आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा आय क्यू 160 आहे. या चाचणीनंतर नेहाचा समावेश इंग्लंडमधल्या प्रतिष्ठीत मेन्सा संघटनेत झालाय. नेहाला तिच्या आई वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचंय आहे.

close