आम्ही पराभूत होऊ शकत नाहीत- रतन टाटा

December 22, 2008 3:34 AM0 commentsViews: 5

21 डिसेंबर मुंबईताज पॅलेस हॉटेल आता पुन्हा सुरू झालं आहे त्यावेळच्या कार्यक्रमाला टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा उपस्थित होते.या कार्यक्रमात बोलताना टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आम्ही जखमी होऊ शकतो, पण पराभूत होऊ शकत नाहीत, अशा शब्दात तमाम जनतेच्या मनातली भावना उपस्थित लोकांपुढे मांडली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचं लक्ष्य ठरलेलं ताज पॅलेस हॉटेल पुन्हा सुरू झालं आहे.संध्याकाळी ताजमहाल पॅलेस आणि त्यातली सर्व रेस्टॉरण्टस ताजमध्ये येणा-या पाहुण्यांसाठी खुली केली गेली. ताजची द झोडिअ‍ॅक ग्रिल, सॉक, मसाला क्राफ्ट, अ‍ॅक्वेरिअस,शामियाना,स्टारबोर्ड आणि ला पतिसेरी ही रेस्टॉरण्टस खुली झाली. आता ताजचे 9सूट आणि 26 ताज क्लब रुम्स तसंच इतर 268 रुम्सदेखील वापरात येतील. तसेच ताजचे चेंबर्सही खुले केले जातील. या कार्यक्रमाला टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा हे उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर सुमारे 1000 निमंत्रितांना यावेळी तिथं प्रवेश दिला गेला, मात्र सुरक्षाकारणास्तव प्रसारमाध्यमांना हॉटेलच्या आत जाण्यास बंदी होती.

close