महिलांच्या समस्यांसाठी धडपडणारे सावित्रीचे पुत्र !

March 8, 2013 12:37 PM0 commentsViews: 36

रोहन कदम, मुंबई

08 मार्च

समाजातील पुरूषांनी एकत्र येऊन स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करावं या उद्देशाने मावा या संस्थेची स्थापना झाली. या महिला दिनाला मावा या संस्थेला 20 वर्ष पूर्ण होत आहे.

मावा या संस्थ्ेाची सुरुवात झाली, वर्तमानपत्रातल्या एका जाहिरातरुपी आवाहनानं. महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात पुरुषांनी एकत्र यावं असं ते आवाहन होतं. काही समविचारी पुरूष एकत्र आले आणि त्यांनी हा प्रश्न सामूहिक रीतीने सोडवता यावा म्हणून 1993 साली मावा संघटना स्थापन झाली.

पुरुषांपर्यंत अधिक स्पष्टपणे पोहचण्यासाठी आणि त्यांनाही कामात सहभागी करुन घेण्यासाठी 1996 ला पुरुषस्पंदन हे मासिक सुरु केलं गेलं. मावाच्या कामाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हळूहळू बदलत होता. संस्थेच्या कामाला साथ मिळत गेली ती चित्रपट दिग्दशक आशुतोष गोवारीकर, संगीतकार कौशल ईनामदार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांची. तरुण पिढीपर्यंत पोहचण्याचं आव्हानही मावा संस्थेने सहज पेललं.

युथ हेल्पलाईन च्या माध्यमातून ही संस्था राज्यभरातल्या तरूणांशी जोडली गेलीये. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज व्यक्त होतेय. पुरुषांसाठी काम करणार्‍या मावा संस्थेने तर हे बदलाचं पाऊल दोन दशकांपूर्वीच उचललंय.

close