पंढरपूरमध्ये पार पडलं आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग

December 21, 2008 2:58 PM0 commentsViews: 12

21 डिसेंबर पंढरपूरमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आता ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग सुरू झालं आहे.अशा प्रकारचं आपत्ती व्यवस्थापनाचं एक ट्रेनिंग पंढरपूरमध्येही झालं. पंढरपूर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र. एकादशींना होणारी प्रचंड गर्दी बघता आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग इथे महत्त्वाचं होतं. श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीनं पुण्याच्या यशादा, या संस्थेसोबत असंच एक ट्रेनिंग शिबीर घेतलं. एका इमारतीतून दुस-या इमारतीवर कसं जायचं, तसंच जर आग लागली तर, अशा घरांतून लोकांना कसं बाहेर काढायचं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. काही वेळेला बॉम्ब ठेवल्याचे फोन शाळेत येतात. अशावेळी शिक्षकांनी काय करायचं, याबद्दलही शिक्षकांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.आपत्तीच्यावेळी सरकारी मदत कमी पडण्याची शक्यता असते.अशावेळी अशा प्रकारची ट्रेनिंग घेतलेले नागरिक मदतीला धावून येऊ शकतात.त्यामुळे अशा ट्रेनिंगची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

close