सिंचन घोटाळ्यातील पैसे गेले कुठे ?-उदयनराजे भोसले

March 11, 2013 4:15 PM0 commentsViews: 107

11 मार्च

सिंचन प्रकल्पात एवढे घोटाळे झाले आहे. त्याबद्दल जर जाब विचारला तर काय चुकले. कुठे गेले सिंचनावर खर्च केलेले पैसे ? यांनी घोटाळा केला नसता तर आज जनतेच्या दारापर्यंत पाणी आले असते. लोकांनी सांगितलं राजेशाही नको लोकशाही हवी आहे. मग पाहा आता लोकशाहीतले राजे कसे वागतात अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांवर केली. उदयनराजे भोसले सध्या जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी काही चारा छावण्यांना भेटी दिल्या. आणि सरकारवर आपल्या खास स्टाईलमध्ये टीका केली.

close