यूपीएससी प्रश्नी मनसे आमदारांनी अडवली राज्यपालांची गाडी

March 11, 2013 11:30 AM0 commentsViews: 36

11 मार्च

यूपीएससीच्या प्रादेशिक भाषांबाबतच्या धोरणाला विरोध असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आज मनसेच्या सर्व आमदारांनी थेट राज्यपालांची गाडी अडवत निदर्शनं केली. राज्यपालांनी यूपीएससीच्या धोरणाबाबत हस्तक्षेप करावी अशी मागणी मनसेच्या आमदारांनी राज्यपालांकडे केली. त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण मात्र शांततेत पार पडलं.

close