बेळगावमध्ये मराठी उमेदवारांचा जल्लोष

March 11, 2013 11:41 AM0 commentsViews: 28

11 मार्च

बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा फडकला आहे. सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने 33 जागा स्पष्ट बहुमत मिळवलंय. तर 19 कन्नड उमेदवार निवडून आले आहेत. तर 6 उर्दू भाषिक उमेदवार निवडून आले आहे. पण माजी उपमहापौर रेणू किल्लेदार आणि माजी महापौर मंदा बाळेकुंद्री यांना मात्र पराभवाचा धक्का बसलाय. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचीच पालिकेवर सत्ता होती. पण, कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. एकाही पक्षाने पक्षचिन्हावर ही निवडणूक लढवली नाही. यामुळे ही निवडणूक मराठी विरुध्द कन्नड भाषिक अशीच होती.

close