खडसेंनी घोटाळ्यांना वाचा फोडली पण पुढे काय झालं ?-नांदगावकर

March 11, 2013 5:10 PM0 commentsViews: 46

11 मार्च

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचा आरोप केला. तर खडसेंनी विधिमंडळात घोटाळ्यांच्या विषयांना केवळ वाचा फोडली. त्याचा पाठपुरावा केला नाही, असं मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. खडसेंनी घोटाळ्यांचा लेखाजोखा आधी द्यावा, मग आम्ही पुरावे देऊ असं आव्हान नांदगावकर यांनी दिलंय. मनसेनं केलेल्या आरोपांनुसार पवईतल्या हिरानंदानी बिल्डरचं प्रकरण, आकृती बिल्डर्सचं प्रकरण, श्रीपती टॉवर्सचं प्रकरण, शिवालिक बिल्डरचं प्रकरण, पुण्यातल्या येरवड्यातल्या मुकुंद भवन ट्रस्टचं प्रकरण आणि पुण्यातल्या अवैध टेकड्यांचं प्रकरण अशी प्रकरणं खडसेंनी विधानसभेत आणली पण त्यापुढे काय असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केलाय. या याशिवाय विदर्भ सिंचन घोटाळ्यातली अनेक प्रकरणं आपण पुराव्यांनिशी काढल्याचा दावा खडसेंनी वेळोवेळी केला. पण, या घोटाळ्यावरची एसआयटी लंगडी असल्याचं खडसे म्हणत आहे. यावर अशी कमजोर एसआयटी सेना-भाजपनं स्वीकारलीच कशी असा सवालही मनसेचे नेते उपस्थित करत आहेत.

close