किर्लोस्कर कामगार युनियननं पाडला नवीन पायंडा

December 21, 2008 3:30 PM0 commentsViews: 1

21 डिसेंबर पुणेस्नेहल शास्त्रीमंदीच्या काळात पुण्यातल्या किर्लोस्कर ऑईल इंडस्ट्रिजच्या मदतीला कामगार युनियन धावून आली आहे. मंदीच्या या कठीण काळात आठवड्याचा एक दिवसाचा पगार कंपनीनं कमी करावा असं कामगार युनियनने मॅनेजमेंटला सांगितलं आहे. पुण्यातल्या सुप्रसिद्ध किर्लोस्कर कंपनीच्या अनेक युनिटसला सध्या मंदीची झळ बसत आहे. अशात पुण्यातल्या खडकी इथल्या ऑईल इंजिन कंपनीला वाचवण्यासाठी कामगार युनियन पुढे सरसावली आहे.कंपनीनं आठवडा 5 दिवसाचा करून, एका दिवसाचा पगार कमी करावा, असा प्रस्ताव युनियननं मॅनेजमेंटसमोर मांडला आहे. याबाबत किर्लोस्कर कामगार युनियनचे पदाधिकारी, सुशिलकुमार फेड्रिक सांगतात, आम्हाला वाटतं की आम्ही या वाईट परिस्थितीत कंपनीला मदत करावी, कंपनीला हातभार लावावा म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या निर्णयाबाबत किर्लोस्कर मॅनेजमेंटचे विजय वर्मांना विचारलं असता ते सांगतात, आमच्या युनियननी असा निर्णय घेणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच पैसे वाचवणे हे सध्या महत्त्वाचे असले तरी पैसे कापणे हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही म्हणून कामगारांचे पैसे आम्ही कापणार नाही. असं मॅनेजमेंटतर्फे त्यांनी स्पष्ट केलं आहे.कामगार युनियननं पुढाकार घेऊन अशा प्रकारचं पाऊल उचलणं हा सध्याच्या काळातला एक दुर्मिळ नमुना आहे.

close