सरकार म्हणते, ‘पाणी नको,दारू प्या’ -तावडे

March 12, 2013 3:06 PM0 commentsViews: 39

12 मार्च

राज्यात दुष्काळ असताना उद्योगांचं पाणी कपात करण्याचं राज्याचं धोरण आहे. त्यानुसारच औषध निर्माण करणार्‍या कंपन्यांच्या पाण्यातही सरकारनं कपात केलीय. मात्र मिनरल वॉटर, बीयर आणि दारू बनवणार्‍या कंपन्यांना मात्र मुबलक पाणी देण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय. सरकारचं हे धोरण म्हणजे पाणी नको,दारू प्या असंच आहे याबद्दल सरकारने उत्तर दिलं पाहिजे असंही ते म्हणाले.

close