संतप्त नागरिकांनी केली ‘टोल’फोड

March 12, 2013 3:38 PM0 commentsViews: 36

12 मार्च

ठाणे : येथे मनोर हायवे वर असलेल्या टोलनाक्याची तोडफोड नागरिकांनी केली. या रस्त्याचं काम अर्धवट असतानाही टोलवसुली केली जात असल्याचा या भागातल्या रहिवाशांचा आरोप आहे. तोडफोड करणार्‍या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी टोलनाक्यावरच्या कर्मचार्‍यांनी चक्क गोळीबार केला. यात 2 जण जखमी झालेत. पण संतापलेल्या जमावानं या गोळीबार करणार्‍यांना चांगलाच चोप दिला. जमावानं यानंतर टोल नाक्याची तोडफोड केली. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा या आंदोलनात समावेश होता. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तर जखमींवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close