ग्रेट भेट : डॉ.नरेंद्र जाधव

March 12, 2013 5:34 PM0 commentsViews: 1310

डॉ.नरेंद्र जाधव सध्या केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाचे आणि राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत. नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे चीफ इकॉनामी ऍडव्हाईझर होते. या पदासाठी रिझर्व्ह बँकेत तशी जागा निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद ही भुषवलं आहे. आयुष्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. अफगानिस्तान आणि इथोपिया इथं काम केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या सारखंच डॉ.नरेंद्र जाधव यांचं व्यक्तीमत्त्व अतिशय प्रेरणादायी आहे अशा शब्दात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गौरव केलाय. नरेंद्र जाधव यांचा हा विस्मयकारी प्रवास तपासण्याचा हा प्रयत्न….

close