बिल्डरावर गोळीबार कॅमेर्‍यात कैद

March 12, 2013 5:42 PM0 commentsViews: 32

12 मार्च

मुंबई : विरारमध्ये आज सकाळी बिल्डर आणि त्याच्या मित्रावर गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या फूटेजमध्ये बिल्डर आणि त्याच्या मित्रावर एक व्यक्ती अगदी जवळून गोळीबार केल्याचं दिसतंय. यात बिल्डर जखमी झाला नाही. पण त्याच्या मित्राच्या पायात गोळी लागली. याप्रकरणी पोलिसांनी बिल्डरच्या दोन माजी कर्मचार्‍यांना अटक केली आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

close