असा झाला ‘काळ्या पांढर्‍या’चा भांडाफोड

March 14, 2013 4:58 PM0 commentsViews: 63

14 मार्च

खाजगी बँक'किंग' क्षेत्रातील अग्रगण्य एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस या देशातल्या तीन मोठ्या खाजगी बँका मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वेबसाईटनं केला. या बँका उघडपणे ग्राहकांना काळ्या पैशांचं रुपांतर पांढर्‍या पैशांत करून देतात असं कोब्रापोस्टनं म्हटलंय. त्यासाठी या बँका आयकर कायदा, फेमा, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वं, केवायसी तत्वं, बँकिंग कायदा आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्टचं सर्रास उल्लंघन करतात. या वेबसाईटने यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं असून शेकडो तासांचे फुटेज आमच्याकडं उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, ICICI नं या प्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमली असून दोन आठवड्यांत अहवाल मागवला आहे.

कोबरा पोस्टनं ऑपरेशन रेड स्पायडर या नावानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय. सर्वात आधी कोबरा पोस्टचा रिपोर्टर दिल्लीतल्या HDFC बँकेत गेला, तेव्हा तिथे काय घडलं. ऑपरेशन रेड स्पायडररिपोर्टर – नक्की सांगू शकाल ?भौमिक – खात्री बाळगारिपोर्टर – म्हणजे हे 50 लाख आहेत… तर 75 लाख होतीलभौमिक – 70.5 भौमिक – हो, आपोआप होतीलरिपोर्टर – म्हणजे 75 लाख मिळतील, बरोबर?भौमिक – हो, 75 लाखरिपोर्टर – तर मला 75 लाख मिळतील आणि सगळी रक्कम मला चेकनं मिळेल?भौमिक – सगळे पैसे पांढरे करून तुमच्या खात्यात जमा केले जातीलरिपोर्टर – तर मला सगळे पैसे पांढरे करून मिळतीलभौमिक – होरिपोर्टर – TDS किती जाईल?भौमिक – काहीच नाहीरिपोर्टर – 100%भौमिक – हो, म्हणूनच तर आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक घेतोभौमिक – कर्मचारी म्हणून आम्ही पुनरावलोकन करतोय, पाच वर्षं मोठा काळ नाहीरिपोर्टर – माझा मुख्य उद्देश काळे पैसे पांढरे करणं हा आहे

close