रोह्यामध्ये दारुतून विषबाधा, दोघांचा मृत्यू

December 22, 2008 4:18 AM0 commentsViews: 2

22 डिसेंबर, रायगड विषारी गावठी दारू प्यायल्यामुळं रायगड जिल्ह्यामधल्या रोहा तालुक्यातल्या देवकान्हे गावातील एकूण 77 जणांना विषबाधा झाली आहे. त्यात दोन जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण अत्यवस्थ आहेत. रविवारी रायगड जिल्हातील 180 ग्रामपंचायतीचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर गावठी दारू प्यायल्याने ही घटना घडली. या घटनेतील विषबाधा झालेल्या काहीजणांवर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर असलेल्या 19 जणांना मुंबईतील जेजे रुग्णालयात, तिघांना केईएम आणि एकाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलय. यामध्ये चौघांची परिस्थिती गंभीर आहे. रायगड जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. यापुर्वीही पाली याठिकाणी लोकांना दारूतून विषबाधा झाली होती. या दोन्हीही घटना पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याच मतदारसंघात घडल्या आहेत.

close