नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड

February 27, 2012 1:41 PM0 commentsViews: 2

27 फेब्रुवारी

नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ घटना घडत असताना काल रात्री पुन्हा काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. शहरातील सातपूर परिसरातील श्रमिक नगर इथं काल मध्यरात्री 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही तोडफोड अंतर्गत भांडणातून झाल्याचं समजतंय.

close