मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा

February 27, 2012 1:48 PM0 commentsViews: 9

27 फेब्रुवारी

आज राज्यभरात मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवसेना स्थानिक लोकाधिकार समिती महासंघातर्फे मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात जीवनगाणी प्रस्तुत रक्त मराठी फक्त मराठी हा सांगितीक कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत गांधीनगर परीसरातील नागरिकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बैलगाडी चित्ररथ तयार केले होते.यावेळी शाळकरी मुलांनी लेझीम सादर केले. यावेळी मोठ्यासख्येनं डोंबिवलीकर सहभागी झाले होते.

close