पुण्यात जन्मकुंडलीची होळी

February 27, 2012 2:05 PM0 commentsViews: 3

27 फेब्रुवारी

जन्म कुंडली आणि पत्रिकांच्या आधारावर आयुष्य बेतणं हे थोतांड आहे हे सांगण्यासाठी पुण्यामध्ये पत्रिका आणि जन्मकुंडलीची होळी करण्यात आली. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यासमोर अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर,बाबा आढाव आणि विद्या बाळ उपस्थित होत्या. पुण्यामध्ये काही महिन्यांपुर्वी पत्रिकेच्या आधारे आपलं आयुष्याचं नुकसान होईल, असं मानून एका कुटुंबाने आत्महत्या केली होती. अशा घटना थांबवायच्या असतील, तर पत्रिका थोतांड आहे, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. विज्ञान दिनाच्या मुहुर्तावर हा दृष्टीकोन लोकांमध्ये जोपासला जावा यासाठी या आंदोलनाचे आयोजन कऱण्यात आलं होतं. यावेळी पत्रिकेवर विश्वास ठेवणार नाही. त्याबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकेन जोपासेन, अशी शपथ घेत उपस्थितांनी आपापल्या जन्मकुंडलीची होळी केली. यापुढे लग्न जमवताना किंवा आयुष्य घडवताना पत्रिकेवर विश्वास ठेवू नका असा संदेश विद्या बाळ आणि नरेंद्र दाभोळकर यांनी यावेळी दिला.

close