मराठी दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या 2 पुस्तकांचे प्रकाशन

February 27, 2012 2:12 PM0 commentsViews: 2

27 फेब्रुवारी

मराठी दिनाचं औचित्य साधून आज दोन पुस्तकांचे भाषांतर प्रसिद्ध करण्यात आलं. शोध शेक्सपिअर या कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आणि जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या दीर्घ निंबंधाच्या संग्रहाचं मराठी भाषांतर अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन आज झालं. शोध शेक्सपिअरचा या पुस्तकामध्ये ऑथेलो आणि मॅकबेथ ह्या नाटकातील विविध विषयावर लेख आहेत. ही दोन्ही भाषांतर अरुण नाईक यांनी केली आहेत. मुंबईत आज झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरु राजन वेळूकर,विजय केंकरे,जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा दिनानिमित्ताने चांगली इंग्रजी पुस्तक मराठीत आणण्याचा संकल्प आमच्या मराठी विभागाकडून केला जाईल.असं आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांनी दिलं.यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित नृत्याविष्कारही सादर करण्यात आला.

close