मुंबईचे महापौरपद भाजपला पाहिजे – तावडे

February 27, 2012 4:23 PM0 commentsViews: 5

27 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 68 हजार मतं वाढवली आहे. आम्हाला आता बरोबरीचा वाटा पाहिजे आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदाची एक टर्म आम्हाला देण्यात यावी अशी मागणी भाजपचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेकडे केली आहे. आजपर्यंतच्या युतीच्या इतिहासात भाजपने ही पहिल्यांदाच मागणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेनं आपला भगवा फडकवला. गेली 16 वर्षाची सत्ता कायम राखत काँग्रेसला धोबीपछाड दिला. पण विरोधाकांना नमतेकरुन विजयी जल्लोष साजरा करत असताना अचानक शिवसेना-भाजपमध्ये मतभेदाचे सुरु उमटू लागले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा फोन बाळासाहेब ठाकरे पर्यंत पोहचू दिला जात नाही असा आरोप झाला. पण हे 'मिस कनेक्शन' चुकून झाले असं सांगत वादावर पडदा टाकला. मार्चमध्ये गडकरी यांची भेटही पक्की झाली. दोन दिवस उलटत नाही तोच विनोद तावडे यांनी मागणीचा बॉम्ब टाकला. या महापालिका निवडणुकीत भाजपने अपक्षेपेक्षा जास्त यश संपादन केलं आहे. या निवडणुकीत जवळपास 68 हजार मतं जास्त वाढवली आहे. त्यामुळे महापौरपदावर कार्यकर्त्यांचा हक्क आहे. आणि आम्ही हे ताकदीवर मागत आहोत. त्यामुळे एक टर्म महापौरपदाची भाजपला देण्यात यावी अशी जाहीर मागणी तावडे यांनी केली. तसेच अनेक वार्डात रिपाइंमुळे आमचे उमेदवार निवडून येण्यास मोठी मदत झाली त्याबद्दल तावडेंनी आठवलेंचे अभिनंदन केलं. तावडे यांच्या महापौरपदाच्या मागणीमुळे शिवसेना आता काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

close