सोनिया गांधीचा पाकला इशारा

December 21, 2008 4:21 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर, जम्मू 'आम्हाला कमजोर समजू नका. दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत, अशा शब्दात पाकिस्तानला सोनिया गांधीनीही जम्मूतल्या सभेत बोलताना इशारा दिलाय.' दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. त्याविरोधात आपण लढा देऊ. मानवी मूल्य आणि मानवतेच्याविरोधात असणार्‍यांशी कुठलीही तोडजोड केली जाणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. पण त्यामुळे आम्हाला कमजोर समजू नका. जे लोक स्वत:च्या भूमीत दहशतवादाला प्रोत्साहन देतात, त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत ', असं सोनिया गांधी यांनी सभेत सांगितलं.

close