माजी आ.दुर्रानींनी घेतली वैष्णवीच्या शिक्षणाची जबाबदारी

February 27, 2012 5:20 PM0 commentsViews: 1

27 फेब्रुवारी

परभणी जिल्ह्यातल्या हदगावच्या वैष्णवीच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी, वैष्णवीच्या शिक्षकाणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आयबीएन-लोकमतच्या बातमीनंतर दुर्रानी यांनी हदगावला जावून वैष्णवीची भेटही घेतली वैष्णवीचं चटापटा उत्तर ऐकून दुर्रानी हारखून गेले. त्यांनी तातडीने तिच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या या निर्णयाचे वैष्णवीच्या वडिलांनी आभार मानले.

चटाचटा उत्तर देणारी वैष्णवी अवघ्या 4 वर्षांची आहे. अंगणवाडीत शिकणार्‍या वैष्णवीच्या या हुशारीनं सगळेचं चकीत झाले आहे. एकदा ऐकलेली कुठलीही गोष्ट हिच्या लक्षात राहते आणि म्हणूनच ती परभणीत आश्चर्याचा आणि कौतुकाचा विषय झाली. वैष्णवीचे वडिल हदगाव नखाते या परभणी जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात टेलर आहेत. वैष्णवीच्या हुशारीवर ते खूष आहेत. पण त्यांना तिच्या पुढच्या शिक्षणाची चिंता सतावतं होती. चार वर्षांच्या या चिमुरडीला डॉक्टर व्हायचं आहे. तिची अफाट स्मरणशक्ती पाहता..पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी, वैष्णवीच्या शिक्षकाणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे.

close