‘आदर्श’मध्ये अनेक बेनामी फ्लॅट्स

February 28, 2012 9:34 AM0 commentsViews: 4

28 फेब्रुवारी

वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये अनेक बेनामी फ्लॅट्स असल्याची माहिती सीबीआयने हायकोर्टात दिली. हे फ्लॅट्स बोगस नावावर नोंदवण्यात आले असून फ्लॅटचे पैसे अनेक बँक अकाऊंट्समधून वळते झाले आहेत असं सीबीआयनं स्पष्ट केलंय. त्यामुळे अनेक मोठ्या लोकांची बिंग फुटण्याची शक्यता आहे.आदर्शची ही वादग्रस्त इमारत कुठल्या ना कुठल्याप्रकरणी सतत चर्चेत असते. न्यायालयीन आयोगाचा अंतरिम अहवाल सादर राज्य सरकारला सादर होतोय तोच या इमारतीतल्या अनेक मोठ्या व्यक्तींच्या बेनामी फ्लॅट्सची माहिती हायकोर्टात उघड होईल असं दिसतंय. आदर्शमध्ये अनेक बेनामी फ्लॅट्स असल्याची धक्कादायक माहिती सीबीआयने हायकोर्टात दिली आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयकडे आहेत. त्यामुळे सीबीआयचा अहवाल महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर फ्लॅट्ससाठीपैशांच्या देवाणघेवाणीची चौकशी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट अर्थात ईडीमार्फत होते. मात्र ईडीच्या तपासावर हायकोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

याआधी आदर्श सोसायटीतल्या सदस्यांच्या प्रतिज्ञापत्रांची माहिती इन्कमटॅक्स विभागाने उघड केली. त्यामध्ये अनेकांच्या फ्लॅटसाठी इतरांच्या बँक खात्यांमधून पैसे वळते झाल्याची बाब समोर आली. त्यात आता बेनामी फ्लॅट्सच्या मालकांची नावं पुढे आल्यास त्यामध्ये अनेक राजकारणी आणि अधिकारी अडकतील असं दिसतं आहे.

close