समलिंगी संबंधांबाबत कोर्टाने केंद्राला फटाकारले

February 28, 2012 10:46 AM0 commentsViews: 12

28 फेब्रुवारी

गे सेक्सच्या मुद्द्यावरुन आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चपराक लगावली. या मुद्द्यावर वारंवार भूमिका बदलून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका, अशी तंबीच कोर्टाने दिली. गे सेक्स अनैतिक नसल्याचे प्रतिज्ञापत्र आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात सादर केलं. पण यापूर्वी झालेल्या सुनावणीत गे सेक्स अनैतिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं. त्यावरुन कोर्टाने आज केंद्राला पुन्हा एकदा फटकारलंय. पण त्यावेळी चुकून जुनंच प्रतिज्ञापत्र देण्यात आलं, आम्ही भूमिका बदलली नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.

close