भारताचा ‘विराट’विजय;आव्हान कायम

February 28, 2012 11:01 AM0 commentsViews: 39

28 फेब्रुवारी

सतत पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियाला आशेचा विजयी किरण सापडला. भारतीय क्रिकेट टीमने अखेर श्रीलंकेविरुद्ध सात विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. आणि मोलाचा बोनस पॉइंटही खिशात टाकला. श्रीलंकनं टीमने समोर ठेवलेलं 321 रन्सचं आव्हान भारतीय टीमने केवळ 37व्या ओव्हरमध्येच पार केलं. भारतीय टीमचा हा सर्वात वेगवान विजय ठरला आहेत. भारतीय बॅट्समनचा धडाकाच असा होता की, अचूक बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या लसिथ मलिंगाच्या सात ओव्हरमध्ये 96 रन्स निघाले. भारतीय विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली.. त्यांनी 86 बॉलमध्ये 133 रन करताना त्याने दोन सिक्स आणि पंधरा फोर मारले. कोहलीची ही नववी वन डे सेंच्युरी. इतर सगळ्या बॅट्समनची चांगली साथ त्याला मिळाली. सेहवाग 30, सचिन 39 तर गंभीर 63 रन केले. रैना सोबत चौथ्या विकेटसाठी कोहलीने 55 बॉलमध्ये 120 रन्सची पार्टनरशिप केली. रैना 40 रन्सवर नॉटआऊट राहिला. या विजयामुळे सीरिजमध्ये फायनल गाठण्याची आशा निर्माण झालीय. अर्थात त्यासाठी पुढच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला लंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.

close