एलिफंटा बेटाच्या सुरक्षेत अजूनही सुधारणा नाही

December 21, 2008 3:44 PM0 commentsViews: 28

21 डिसेंबर नवी मुंबईविनय म्हात्रे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही काही ठिकाणच्या सुरक्षेत फारसा सुधार झालेला नाही. त्याचं उदाहरण म्हणजे एलिफंटा बेट. मुंबई जवळचं जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटाच्या काही अंतरावरच महत्त्वाचे 6संवेदनशील प्रकल्प आहेत. एलिफंटाची माहिती तालिबानी अतिरेक्यांकडे आढळून आली होती. असं असलं तरी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही नवी मुंबईतल्या एलिफ ंटा बेटाच्या सुरक्षेत फारसा सुधार झालेला नाही. मुंबईवर आत्तापर्यंत जे अतिरेकी हल्ले झाले, त्यासाठी वापरलेलं आरडीएक्स सागरीमार्गानंच मुंबईत आलं. आता अजूनही समुद्र मार्गानंच आरडीएक्स येऊ शकतं. फक्त मुंबई शहरावरच नाहीतर मुंबईच्या समुद्रात आणि किना-यावर वसलेल्या संवेदनशील प्रकल्पावरही हल्ले होऊ शकतात. हे हल्ले होऊ शकतात नवी मुंबईतल्या समुद्रात वसलेल्या एलिफंटा बेटावरून. एलिफंटा बेट साडेसात किलोमीटर परिसरात वसलंय. या बेटापासून तीनच किलोमीटरच्या अंतरावर आहे देशातलं सर्वात मोठं जेएनपीटी बंदर, जिथं महिन्याला येतात साडेतीन लाख कंटेनर. तर एलिफंन्टाच्या दुस-या बाजूस आहे नेव्हीचं शस्त्रागार. जिथं मोठ्या प्रमाणावर लष्कराचा दारूगोळा आहे. शेजारीच बुचर आयलंड आहे.जिथं ओएनजीसीचं ऑईल रिफायनरी सेंटर आहे. या ठिकाणी एक लाखाहूनही अधिक टन क्रूड ऑईलचा साठा आहे. तर मुंबईच्या दिशेला बीपीसीएल कंपनी आहे. जिथं मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा आहे. बीपीसीएलच्या शेजारीच बीएआरसी म्हणजेच भाभा अणुसंशोधन सेंटर आहे. ही सर्व महत्त्वाची ठिकाणं एलिफंटापासून अगदी जवळच्या अंतरावर आहेत. पण इथल्या सुरक्षेत अजूनही कोणत्याच प्रकारची वाढ करण्यात आली नाही. याबाबत जेएनपीटीचे ट्रस्टी-भूषण पाटील सांगतात, एलिफंटामुळे सगळ्याच प्रकल्पाना धोका आहे. तेथे कोणतीच कडक सुरक्षा व्यवस्था नाही. सुरक्षाव्यवस्थेबाबत मोरा पोलिस स्टेशनचे, सीनियर इन्स्पेक्टर – कमलाकर यळमकर सांगतात,आमच्याकडे 15 वर्ष जुनी बोट आहे. तसंच आता दुर्बिण, बुलेटप्रुफ जॅकेट आणि अद्यावत शस्त्रांची आम्ही आता मागणी केली आहे.मुंबईतील ताज आणि ओबेरॉय इथल्या हल्ल्याच्या जखमा अजून पुसल्या नसताना ताज हॉटेलपासून जवळच असलेलं एलिफंटा बेटाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता गरज आहे ती सुरक्षा सुधारण्याची आणि सरकारनं जागं राहण्याची.

close