अरविंद केजरीवाल मतदानाला मुकले

February 28, 2012 12:59 PM0 commentsViews: 3

28 फेब्रुवारी

टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्या उत्तर प्रदेश निवडणुकीतल्या मतदानावरून वाद निर्माण झाला होता. नायडामध्ये सहाव्या टप्प्यासाठी मतदान आज पार पडले. पण या मतदानाला हजर न रहाता केजरीवाल गोव्याच्या एका कार्यक्रमाला गेले. तिथे मीडियाने त्यांना मतदानाची आठवण करून दिल्यावर ते तातडीने नायडामध्ये आले. पण नायडामधल्या मतदान केंद्रावर ते गेले तेव्हा मतदार यादीत आपलं नावच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि ते मतदान करू शकले नाहीत. टीम अण्णांच्या मतदार जागृती अभियानाचा बराच गाजावाजा झाला. पण आता खुद्द केजरीवाल यांनीच मतदानाकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं.

close