पुण्यात 1 मार्चपासून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा

February 28, 2012 4:50 PM0 commentsViews: 5

28 फेब्रुवारी

थंडीचे दिवस संपून नुकतंच ऊन पडायला लागलंय आणि या उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरुन पुणे महापालिकेनं 'पाणी'बाणीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पुणे शहरात आता फक्त एकाच वेळी पाणी पुरवठा होणार आहे. ही अंमलबजावणी 1 मार्चपासून होत आहे. शहरात पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.

close