एलएलबी डीग्रीप्रकरणी 7 पोलीस अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश

February 28, 2012 5:28 PM0 commentsViews: 21

28 फेब्रुवारी

वरीष्ठ आयपीएस अधिकारी के.एल.बिष्णोई यांच्या एलएलबी डीग्रीप्रकरणी हायकोर्टाने सात बड्या पोलीस अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. 2005 मध्ये एलएलबीच्या परीक्षेला गैरहजर असलेले के. एल. बिष्णोई हे चांगल्या मार्कांनी पास झाले होते. सिद्धार्थ विधी महाविद्यालयात प्रोफेसर असलेल्या चित्रा साळुंखे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी तत्काळ कुलगुरूंकडे धाव घेतली. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यांनी पोलीस अधिकार्‍यांकडेही तक्रारी केल्या. पण पोलीस अधिकार्‍यांनी बिष्णोई यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चित्रा साळुंखे यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांच्या याच याचिकेवर कोर्टाने निकाल देताना बिष्णोई यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या सात अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

कुणाची होणार चौकशी?

राकेश मारिया – गुन्हे विभागाचे सहआयुक्त होते – त्यावेळी पोलीस आयुक्तांना खोटा अहवाल पाठवला- चित्रा साळुंखेंच्या तक्रारीची चौकशी करून कारवाई केल्याचं म्हटलंनवल बजाज- झोन 1 चे उपायुक्त असताना सांळुखेंनी अनेक तक्रारी केल्या- बजाज यांनी तक्रारींवर कारवाई केली नाही- पण उपमुख्यमंत्री, मानवी हक्क आयोगाला खोटा अहवाल दिला

विश्वास नांगरे-पाटील- आझाद मैदान पोलिसांनी साळुंखेंना 12 तास डांबून ठेवलं होतं- त्यावेळी नांगरे-पाटील झोन 1 चे पोलीस उपायुक्त होते- त्यांनी उपमुख्यमंत्री, एससी, एसटी आयोगाला खोटा अहवाल दिला

संजय सक्सेना – चित्रा साळुंखेंनी बिष्णोई यांच्याविरुद्ध तक्रार केली होती- बिष्णोई आणि सिद्धार्थ कॉलेजच्या प्राचार्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला होता – त्यावेळी सक्सेना आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त होते – सक्सेना यांनी खोटा अहवाल तयार केला

ब्रिजेश सिंग – सिंग यांच्याकडे काही अधिकार्‍यांच्या चौकशीची जबाबदारी होती- पण चौकशी न करताच खोटा अहवाल दिला

मोहन राठोड – नागरी संरक्षण विभागाचे डीआयजी होते – राठोड यांच्याकडे साळुंखेंनी अनेक तक्रारी केल्या होत्या – या तक्रारींची चौकशी केली नाही- उलट नवल बजाज यांचाच खोटा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला

close